सिंधुदुर्गात ६ महिन्यात ४० अपघात २१ लोकांचा मृत्यू महामार्गावरील शॉर्टकट ठरताहेत जीवघेणे

0
135

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गाचे अपूर्ण काम अपघाताला जेवढे कारणीभूत ठरत आहे तेवढेच महामार्गावरील शॉर्टकट जीवघेणे ठरत आहेत. गेल्या ६ महिन्यात झालेल्या सुमारे ४० अपघातात २१ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. लोकांचे सातत्याने जीव जात असताना अपघातांच्या मूळ कारणांकडे मात्र दुर्लक्ष केला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गाची लांबी ९० किलो मीटर इतकी आहे. चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाली असली तरी काही ठिकाणी महामार्गाच्या लेनची लेवल, मजबुतीकरण, डांबरीकरण, सर्व्हिस रस्ते यांची कामे बाकी आहेत. काही भागात स्थानिक पातळीवरची भौगोलिक स्थिति समजून न घेता भरावयाचे काम केले असल्याने पावसाळ्यात रहिवाशांच्या घरात पाणी घुसण्याची समस्या सातत्याने घडत आहे.

महामार्गावर ५६ ठिकाणी जीवघेणे ‘शॉर्टकट’

सिंधुदुर्ग जिल्हा हद्दीतील महामार्गाच्या खारेपाटण ते झाराप पर्यंतच्या टप्प्यात तब्बल ५६ ठिकाणी असे जीवघेणे शॉर्टकट मार्ग तयार करण्यात आलेले आहेत. जिल्हा परिवहन अधिकार्‍यांनी महामार्गाच्या केलेल्या सर्व्हेक्षण अहवालात ही बाब उघड झाली आहे. मात्र याबाबत नॅशनल हायवे अ‍ॅथॉरेटीचे अधिकारी या बाबीकडे दुर्लक्ष करत आहेत. महामार्गाचा मधील डिव्हाइडर फोडून हे जीवघेणे शॉर्टकट मार्ग तयार करण्यात आले आहेत.

अनेकांचे जाताहेत बळी

गेल्या सहा महिन्यात या महामार्गावर सुमारे ४० अपघात झालेत, यामध्ये २१ व्यक्तींचा मृत्यू झाला. १२ जण गंभीर जखमी झाले. १० जण किरकोळ जखमी झाले आहेत.या अपघातांपैकी सर्वाधिक अपघात या अनधिकृत शॉर्टकटमुळे झालेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here