सिंधुदुर्गात आडेली काबळेवीर येथील धरण परिसरात दोघे मित्र बुडाले.. वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते धरणावर

0
158

 

सिंधुदुर्ग – वेंगुर्ला आडेली कामळेवीर येथील धरण परिसरात दोघे मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. येथील धरणात पोहण्याच्या नादात या दोन्ही मित्रांचा करून अंत झाला आहे. सावंतवाडी मळगाव आबेड़करनगर येथील हे दोन्ही यूवक आहेत. मिलिंद जाधव (२७) अमोल गौतम मळगावकर (३०) अशी या युवकांची नावे आहेत.

हे दोघेहीजन बराच वेळ घरी न आल्यामुळे त्यांची शोधाशोध सुरू झाली.बयेथील धरण परिसरात दूचाकी , कपडे व ईतर साहित्य लोकांना आढळून आले. मात्र हे दोघे यूवक बेपत्ता असलेल्याचे लक्षात आले. वेंगुर्ला व सावंतवाडी तहसीलदार तसेच पोलिस घट्नास्थळी आल्यानंतर धरणात शोधकार्य सुरू करण्यात आले.
दुपारनंतर दोघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. या दोन युवकांपैकी अमोल गौतम मळगावकर याचा काल 24 जून रोजी वाढदिवस होता. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते धरणावर गेले होते आणि त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here