सिंधुदुर्गातील दोन रुग्ण कोरोना मुक्त शुभेच्छा देत संबंधित रुग्णांना भावपुर्ण निरोप

0
297

 

सिंधुदुर्ग – वायगंणी ता. वेंगुर्ला, जांभवडे ता. कुडाळ येथील दोन व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातून आज दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी उपस्थित आरोग्य विभागातील डॉक्टर्स, नर्स व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी टाळ्या वाजवत शुभेच्छा देत त्यांचे कोरोनामुक्त झाल्याबदल अभिनंदन करुन शासकीय रुग्णवाहिकेत बसवून त्यांना भावपुर्ण निरोप दिला.

वायगंणी ता. वेंगुर्ला, येथील एक व जांभवडे ता. कुडाळ येथील एक अशा दोन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात औषधोपचार सुरु होते. या कक्षातील डॉक्टर्स, नर्स पॅरामेडीकल स्टाफनी योग्यप्रकारे उपचार केले. कोवीड कक्षात दाखल केल्यापासून 14 दिवसानंतर सदर व्यक्तींची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. त्यांचा दोघांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला त्यामुळे त्यांना आज कोवीड कक्षातून डिस्चार्ज करण्यात आले.

यावेळी समुपदेशक रणजित जाधव यांनी संबंधित रुग्णांना घरी परतल्यानंतर कोणत्या प्रकारे स्वत:ची काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करुन त्यांचे मनोबल वाढावे यासाठी समुपदेशन केले.

प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकुरकर यांनी संबंधित रुग्णांचे अभिनंदन करुन कोरोनामुक्त झाल्याबदल शुभेच्छा दिल्या तसेच यापुढे स्वत:ची योग्य प्रकारे खबरदारी घेऊन समाजात वावर कसा असावा याबाबत मौलिक सल्ला दिला. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील, प्रशासकीय अधिकारी डॉ. अविनाश नलावडे, फिजिशियन डॉ. नागेश पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. एम. मोरे, मेट्रन आर. जी. नदाफ तसेच डॉक्टर्स, नर्स पॅरामेडीकल स्टाफ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here