सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर तर मालवणमध्ये वैभव नाईक विजयी

0
192

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी बाजी मारली. तर मागच्यावेळी जायंट किलर ठरलेले मालवणचे आमदार वैभव नाईक यांनीहि विजय संपादन केला आहे. वैभव नाईक यांनी मागच्यावेळी नारायण राणे यांचा प्रभाव केला होता. सावंतवाडीचे केसरकर हे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत.

गोव्यातीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीने आणि काही मंत्र्यांनी या ठिकाणी दीपक केसरकर यांच्याविरोधात राजन तेली यांच्यासाठी प्रचार केला होता.  त्यामुळे हि लढत महत्वाची आणि लक्षवेधी ठरली होती. केसरकर यांनी तिसऱ्यांदा विजयी होत इतिहास रचला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गृहराज्यमंत्री झालेला मंत्री पुन्हा निवडून येत नाही हा इतिहास आहे. तो बदलण्यात केसरकर कारणीभूत ठरले आहेत.

मालवण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा विजय संपादित केला आहे. वैभव नाईक यांनी मागच्यावेळी नारायण राणे यांचा प्रभाव केल्याने त्यांना राज्यात मोठी ओळख मिळाली होती. यावेळी नाईक यांच्या विरोधात भाजप पुरस्कृत उमेदवार रणजित देसाई यांनी मोठे आव्हान उभे केले होते. अखेर नाईक यांनी विजय मिळवत देसाई यांच्यावर मत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here