सावंतवाडी तालुक्यातील सातोसेत मगरीचा शेतकर्‍यावर जीवघेणा हल्ला

0
140

मडूरा पंचक्रोशीत मगरींकडून हल्ला होण्याचे प्रकार सुरुच आहेत. सातोसे – रेखवाडी येथील शेतकरी शशिकांत तानाजी पंडीत (४०) यांच्यावर चिखलात दबा धरुन बसलेल्या मगरीने हल्ला केला. या हल्ल्यात पंडीत यांच्या उजव्या पायाचा मगरीने चावा घेतला. स्थानिकांनी त्यांना तत्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिवराम पंडीत हे आज सायंकाळी भातपीकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते. शेतातील चिखलात असलेल्या मगरीवर पंडीत यांचा पाय बसला. यावेळी मगरीने पंडीत यांच्यावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात मगरीने शेपटीच्या सहाय्याने उजव्या पायावर वार केला. प्रसंगावधान राखत पंडीत यांनी सुरक्षीतस्थळी धाव घेतल्याने अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी शिवराम पंडीत यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी त्यांचेवर उपचार केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आजगाव वनपाल सी. व्ही. धुरी, वनरक्षक राठोड यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी ग्रामस्थांनी मगरींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here