सावंतवाडी खासकीलवाडा येथे गळफास लावलेल्या स्थितीत आढळला परप्रांतीय वृद्धाचा मृतदेह

0
187

 

सिंधुदुर्ग – सावंतवाडी शहरातील खासकीलवाडा येथे आज दुपारी एका परप्रांतीय वृद्धाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत संशयास्पदरीत्या आढळून आला.

संबंधित वृद्धाने आत्महत्या केल्याचा संशय आहे. परंतु त्याचा मृतदेह बादलीवर बसलेल्या स्थितीत आढळून आला.

तर बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त वाहत असल्यामुळे तसेच दरवाजा अर्धवट उघडा असल्याने ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशयही बळावला आहे.

याविषयी नेमकी माहिती पोलिस तपासाअंती प्राप्त होऊ शकेल, असे उपस्थितांचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधित वृद्ध हा गेली काही वर्षे सेंट्रींगचे काम करत होता, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here