शिवसेना भाजप युतीबाबत खासदार विनायक राऊत यांचे मौन पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले मनापासून आभार

0
127

सिंधुदुर्ग – शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात बोलताना भाजप नेत्यांवर आणि केंद्रीय तपास यंत्रणांवरही टीका केली. तसेच प्रताप सरनाईक यांची बाजूही घेतली. पण 2024मध्ये शिवसेना-भाजपची युती होणार का? असा सवाल करताच त्यांनी मौन पाळलं. महाविकास आघाडी पाच वर्षे चालणार, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, असं राऊत म्हणाले. मात्र, युती होणार का या प्रश्नाचं उत्तर देणं सोयीस्कर टाळलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनापासून आभारहि मानले. यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चेला सुरवात झाली आहे.

राऊत यांनी यावेळी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा समाचार घेतला. बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही. प्रताप सरनाईकांच्यामागे ईडीचा ससेमिरा लावायचा, सीबीआयचं प्रेशर आणायचं आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने लिहून घ्यायचं. मुख्यमंत्र्यांवर प्रेशर आणायचं हा कुटील डाव ईडीचा आहे. अशा पद्धतीचे अनेक डाव ईडीने केले आहेत. सरनाईक यांना जो काही त्रास होतोय त्याच्या मुळाशी जाणं गरजेच आहे. सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या पद्धतीने ईडी त्रास देत आहे, तो केवळ आणि केवळ केंद्र सरकारने केलेला सत्तेचा दुरुपयोग आहे, अशी टीका त्यांनी केली.

भाजप-शिवसेनेची युती नैसर्गिक होती. पण त्यावेळेला बेईमानीचा कळस भाजपाने गाठला म्हणून सेनेला भाजपकडून दूर व्हावं लागलं. असं सांगताना विनायक राऊत म्हणाले, चंद्रकांत पाटीलांनी संजय राऊतांना शहाणपणा शिकविण्याची गरज नाही. स्वतःच्या बुडाखाली जे काही जळतंय ते आधी सांभाळा. संपूर्ण देशात केंद्राच्या माध्यमातून ईडी आणि सीबीआय, एनआयएचा ससेमिरा लावायचा आणि विरोधी पक्षाच्या लोकांना त्रास द्यायचा हा एकमेव धंदा केंद्र सरकारने चालू केलेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here