वरेरी- देवगड एसटी बसचा ब्रेक रिकामी होऊन भीषण अपघात दोन शाळकरी मुलं जखमी… एसटी बस अपघाताचे प्रमाण वाढतंय आठवड्यातील देवगड तालुक्यामध्ये तिसरी घटना..

0
184

सिंधुदुर्गातल्या देवगड तालुक्यामध्ये खडवी येथे एसटी बसला भीषण अपघात झालाय .वरेरी या बसला अपघात होण्याची तिसरी घटना असून एसटी बसच्या प्रवासाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत जिल्ह्यात यापूर्वीही अनेक ठिकाणी एसटीचे अपघात छोटे-मोठे मोठ्या प्रमाणात घडले असून एसटी महामंडळाने अजूनही कोणतेही उपाययोजना केले गेले नाहीत. एसटी बसचे अपघाताचे प्रमाण पाहता बस प्रवास सुरक्षित आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,ब्रेक रिकामी झाल्यामुळे तळेबाजार येथून तळवडे टेम्बवलीमार्गे देवगडच्या दिशेने जात असताना खडवी येथे दुपारी २ च्या सुमारास वरेरी- देवगड एस्-टीला अपघात होऊन त्या अपघातामध्ये २ शाळकरी मुले जखमी झाली आहेत.जखमींना तातडीने देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आहे. इतर शाळकरी मुले या प्रकारमुळे भयभीत झाली आहेत. शाळेतील शाळकरी मुलांना, घेऊन जात असतानाच हा अपघात घडला वरेरी – देवगड या दुपारच्या २. च्या एस् – टी मध्ये ही शाळेतील मुले होती. अशोक मोंडकर यांच्या गोठ्याला जाऊन हि एस टी धडकली,सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या आठ दिवसात तिसरा अपघात याच ठिकाणी झालाय. वारंवार याच उतारावर होणाऱ्या अपघातांमुळे उताराच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि वळणावर संरक्षक कठडा बांधण्याची मागणी यापूर्वी केली जात होती.

जिल्ह्यात ब्रेक रिकामी होऊन एसटी बसचा अपघाताचा प्रमाण हळूहळू वाढू लागला आहे त्यामुळे एसटी महामंडळ प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे एसटी बस ग्रामीण भागातील लोकांसाठी जीवन वाहिनी म्हणून पाहिलं जातं. जर अशाप्रकारे एसटीचे अपघात होऊन सर्वसामान्य लोक जखमी होत असतील तर एसटी महामंडळाने याकडे बसच्या दुरावस्थेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. भविष्यामध्ये होणारे एसटी बसचे अपघात टाळण्यासाठी एसटीच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here