रत्नागिरीत ६०० वाहन चालकांवर कारवाई, परशुराम ग्रामपंचायतीने केल्या गावाच्या सीमा बंद, गावकऱ्यांचा सीमेवर जागता पहारा

0
345

 

कोरोना सारखा महाभयंकर आजार दारात येऊन ठेपला असता सरकारच्या आव्हानाला केराची टोपली दाखवत रत्नागिरीकर आज मोठ्या संखेने घरातून बाहेर पडलेत अखेर पोलिसांनी अवघ्या तीन तासात ६०० जणांवर कारवाई केली आहे.  तर रत्नागिरीतील परशुराम ग्रामपंचायतीने गावाच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. गावातून बाहेर जाण्यास आणि कोणीही गावात येण्यास बंदी केली असून गावातील लोकांनीच आता गाव सीमेवर जागता पहारा ठेवला आहे.

घराबाहेर पडू नका असे आवाहन करून सुद्धा रत्नानागिरीकर गरिक किरकोळ कारणास्तव शहरातून फिरू लागल्याने अखेर पोलीसांनी दंडात्मक कारवाईला सुरुवात केली असून अवघ्या तीन तासात तब्बल 600 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी दिली. आता जर वर्दळ कमी झाली नाही तर व्यापक मोहीम हाती घेतले जाईल, ताब्यात घेण्याची वेळ आमच्यावर आणू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परशुराम ग्रामपंचायतीने सोमवारपासून गावातून बाहेर जाणारे सर्व रस्ते मातीचा भराव तसेच बांबूचा अडथळा करत बंद केले आहेत. गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर बंद करताना तेथे ग्रामस्थांनी खडा पहारा ठेवत संपूर्ण गाव बंदी जाहीर केली आह. आतील आणि बाहेरून येणाऱ्या कुणाही व्यक्तीला सोडले जात नाही.

सरपंच गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत अभय सहस्त्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली 40 जणांचा समावेश असलेली कोरोना मुक्त समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून गावच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्यात आली आहे. पुणे मुंबईसह अन्य भागातून येणाऱ्या नातेवाईकांचे प्रमाण लक्षात घेऊन यापुढे गावात एकही नातेवाईक येणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना कुटुंबांना करण्यात आल्या आहेत. नोटे 6 अन्य ठिकाणी कामावर जाणाऱ्या गावातील कामगारांना 31 पर्यंत गावातच थांबण्याच्या सूचना करण्यात आले आहेत. गावात कोणतेही लग्न साखरपुडा सामूहिक बैठका व अन्य कार्यक्रम न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून गाव बंदीचा निर्णय सर्व गाव प्रमुखांनी घेतला असून गावातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत मुख्य रस्त्याच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्थांचा पहारा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here