कोरोनाचा अजून एक रुग्ण रत्नागिरीत सापडला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आजपर्यंत रत्नागिरीतील हा तिसरा रुग्ण आहे. ही एक 52 वर्षीय महिला असून ती गृहिणी आहे.
रत्नागिरी शहरानजिकच्या साखरतर गावातील ही महिला ️4 एप्रिलला जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. ️घरातच राहणाऱ्या या महिलेला कोरोना झाल्याने खळबळ मांजली आहे. दरम्यान साखरतर भागातही दाट वस्ती असूनबइथल्या आणि आजूबाजूच्या अन्य लोकांचीही आरोग्य विभागाकडून तपासणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. ️मात्र तिसरा रुग्ण सापडल्याने रत्नागिरीची चिंता वाढली आहे.