मुख्यमंत्रीपद सोडाच उद्धव ठाकरे साधे दुकानही चालवू शकत नाहीत – निलेश राणे

0
121

सिंधुदुर्ग – मुख्यमंत्रीपद सोडाच उद्धव ठाकरे साधे दुकानही चालवू शकत नाहीत अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी केली आहे. तसेच आपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या बाबतीत यांच्या सरकारचे अधिकारी अहवाल देत असतील तर, त्या अहवालाला काहीही किंमत नाही. कारण ठाकरे सरकार केव्हाच मेलेलं असल्याचेही राणे म्हणाले.

आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याबाबत राज्याचे मुख्य सचिव यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. त्यामुळे शुक्ला यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकत आहे. याबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले, राज्यात सरकार कोणाचे आहे? तेच अहवाल कसे देतात? त्यांच्या अहवालाला भीक कोण घालते असेही निलेश राणे म्हणाले. जितेंद्र आव्हाड इंजिनीयरला मारणारे त्यांच्याकडे कसलाही पुरावा नाही. यांच्या सरकारमध्ये यांचेच अधिकारी जर अहवाल देणार असतील तर त्या अहवालाला काय किंमत नाही. आम्ही तर अशा विषयांना भीक घालत नसल्याचेही राणे म्हणाले.

मुख्यमंत्री घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत. मुख्यमंत्रीपद सोडाच ते साधे दुकाने चालू शकत नाहीत. अशी अवस्था त्यांची झालेली आहे. सहकारी त्यांना साथ देत नाहीत. काँग्रेस वेगळीच भूमिका प्रत्येक विषयांमध्ये घेत चाललेली आहे. राष्ट्रवादीचे स्वतःचे स्वतंत्र नाटक सुरू आहे. मुख्यमंत्री पदाचाच कारभार त्यांना कळत नसल्यामुळे अधिकाऱ्यांशी काय बोलावं ? कसं बोलावं ? अधिकाऱ्यांना कसं वापरावं ? प्रशासन म्हणजे काय ? या कुठल्याच गोष्टी मुख्यमंत्र्यांना अजून पंचवीस वर्षे गेले तरी कळणार नाहीत. अजून पंचवीस वर्षे फडणवीस साहेबांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद काय, तर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या व सदस्य पदाच्या कारभाराची ट्रेनिंग दिली तरी त्यांना समजणार नाही, अशी टीका निलेश राणे यांनी केली.

राज्यात राष्ट्रपती राजवटी संदर्भात केंद्र सरकारच्या भूमिकेबाबत बोलताना निलेश राणे म्हणाले, त्याच्यामध्ये प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेवर मी बोलणार नाही. प्रोसीजरप्रमाणे किंवा वस्तुस्थिती बघून नियम, कायदा फॉलो करून ज्या काही गोष्टी होणार त्यावर सर्व अवलंबून आहे. भाजपच्या ऑपरेशन लोटसबाबत मला काही माहीत नाही. पण कसले ऑपरेशन करायची गरजच नाही. कारण इकडे ठाकरे सरकार पेशंट म्हणून मेलेलेच आहे. ऑपरेशन जिवंत बॉडीवर करतात, असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here