महाराष्ट्रात सेना भाजपकडून अपक्ष आमदारांची खेचाखेची

0
131

विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप आणि शिवसेनेला अपेक्षित जागा मिळालेल्या नाहीत. सत्ता स्थापन करण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकमेकांवर अवलंबून रहावे लागणार आहे. त्यात गट ५ वर्षात सेनेला भाजपने दिलेली वागणूक पाहता आता सेने त्याचा बदल घेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कारण सेनेकडे असलेले संख्याबळ लक्षात घेता सेनेशिवाय भाजप सत्तेची पायरी चढू शकत नाही. त्यात काँग्रेसने सेनेला मुख्यमंत्रीपदाचे गाजर दाखवून सत्ता स्थापन करण्याचे केलेले आव्हान लक्षात घेता हा विषय जास्तीच हाताबाहेर गेला तर भाजप सत्तेबाहेर राहू शकते. हे लक्षात घेता राज्यात निवडून आलेल्या १३ आमदारांना आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न या दोन्ही पक्षातून होताना दिसत आहेत. सत्ता स्थापनेपूर्वीच अपक्षांना आपल्या बाजूने खेचून आमदारांचा आकडा वाढवून सत्तेचा जास्तीत जास्त वाटा पदरात पाडून घेण्याचा दोन्ही पक्षांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने अपक्षांच्या बळावर हातातोंडाशी आलेला सत्तेचा वाटा हिरावून घेऊ नये म्हणून शिवसेनेनेही अपक्षांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज रामटेकमधून निवडून आलेले अपक्ष आमदार आशिष जैस्वाल आणि भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र गोंडेकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही आमदारांना शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी मातोश्रीपर्यंत आणल्याचं सांगण्यात येतं. तसेच शिवसेनेकडून या दोन्ही आमदारांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आल्याचंही सांगण्यात येतं. तर या दोन्ही आमदारांनी आम्ही अपक्ष लढलो असलो तरी शिवसेनेसोबतच असल्याचं उद्धव ठाकरे यांना सांगितल्याचंही समजत.

महाराष्ट्रातील नव्याने निवडून आलेल्या एकूण २८८ आमदारांचे  पक्षनिहाय संख्याबळ

भाजप- १०५
शिवसेना – ५६
राष्ट्रवादी काँग्रेस- ५४
काँग्रेस- ४४
बहुजन विकास आघाडी- ३
एमआयएम- २
समाजवादी पार्टी- २
प्रहार जनशक्ती पार्टी- २
माकप- १
जनसुराज्य शक्ती- १
क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १
राष्ट्रीय समाज पक्ष- १
स्वाभिमानी पक्ष- १
शेकाप – १
अपक्ष- १३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here