महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (शनिवार) विश्वासदर्शक ठरावाची चाचणी पार पडली. गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा असणार होती. दुपारी २ वाजता या प्रक्रियेला सुरुवात झाली त्यानंतर तासाभरात ही चाचणी पार पडली आणि या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहिले. सरकारला १६९ आमदारांनी समर्थन दिले, तर ४ आमदार तटस्थ राहिले. भाजपाच्या सर्व आमदारांनी यावेळी सभात्याग केल्याने विरोधात शून्य मतदान झाले.
महाविकास आघाडीच्या सरकारला १६९ आमदारांनी सभागृहात समर्थन दर्शवल्याने उद्धव ठाकरे सरकारने हा विश्वासदर्शक ठराव जिंकला. हंगामी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी ही ही घोषणा केली. यावेळी ४ आमदारांनी तटस्थ भुमिका घेतली. तर भाजपाच्या सर्व आमदारांनी सभागृहाचा त्याग केल्याने शून्य आमदारांनी याला विरोध केला असे वळसे-पाटील यांनी जाहीर केली.