सिंधुदुर्ग – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे असलेल्या उपस्थितीत फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत पिळणकर यांनि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या हस्ते पिळणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतला. पक्षप्रवेशानंतर अनंत पिळणकर यांचे
पक्षात स्वागत करण्यात आले आहे. फोंडाघाट येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी डॉ. अभिनंदन मालंडकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितीत होते.