सिंधुदुर्ग : कोकणात नारळाची लागवड मोठय़ा प्रमाणावर होत असली, तरी त्यावर आधारीत प्रक्रीया उद्योग फारसे कोकणात सुरु होऊ शकले नाही. त्यामुळे कोकणात नारळ प्रक्रीया उद्योगांना चालना देण्यासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे.केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यांप्रमाणे कोकणातही नारळ प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याची गरज आहे.मात्र तळकोकणातला एका शेतकऱ्यांला पूर्वीपासून शेतीची आवड असल्याने त्याचं जोरावर आपलं अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण केले आहे.आणि आपल्या यशस्वी कर्तृत्ववाने उद्योजक बनले.
सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावातील पुरुषोत्तम ऊर्फ सचिन दळवी यांचं शिक्षण एमबीए मार्केटिंग झालंय. पण पूर्वी पासून शेतीची प्रचंड आवड होती.वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरी देखील केली पण फारस मन नोकरी रमल नाही.शेतीची आवड असल्यामुळे आपल्याचं मातीतला काहीतरी व्यवसाय करायचा अशी ईच्छा होती म्हणून 2017 साली काथ्या उत्पादनाचं युनिट सुरू केलं.कोकणात नारळाची सोडणं मोठ्या प्रमाणावर मिळतात.परंतु नारळ सोलल्या नंतर सोडणं बाहेर फेकून दिली जातात म्हणून दळवी यांच्या डोक्यात सुपीक कल्पना डोक्यात आली.त्यानंतर दळवी यांनी आपल्या भागातील नारळाची सोडणं गोळा करायला सुरुवात केली.टाकाऊ पासून टीकाऊ अशा दृष्टीने पाहायला सुरुवात केली.दळवी यांच्या युनिट परिसरात मोठ्या प्रमाणावर नारळाच्या सोडनांचा खच पाहायला मिळतोय.आणि इथल्या स्थानिक नारळ बागायदाराणा रोजगार मिळावा हा दुसरा हेतू होता.त्याचप्रमाणे सिंधुदुर्गात किनारपट्टी भागांत नारळाचं प्रमाण अधिक आहे.
नारळाच्या झाडाच्या प्रत्येक भागापासून उपयुक्त वस्तूंची निर्मिती होऊ शकते. पण कोकणातल्या तरुण युवकांने उद्योजकांच्या दृष्टीने पाहिला पाहिजे.कोकणात नारळ विक्रीपलीकडे या पिकाचा फारसा वापर होत नाही.कोकणात 65 हजार हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर नारळाचे उत्पादन घेतले जाते.मात्र नारळाच्या इतर भागांचा वापर करून वस्तूंची निर्मिती करण्याचे प्रमाण नगण्य आहे.नारळाच्या सोडणावर प्रक्रिया करून विविध प्रकारची उत्पादने घेतली जाऊ शकतात.सध्या नर्सरी आणि गार्डनिंग उद्योगांसाठी कोकोपीठ तयार केले जाते.जे मातीतील ओलावा टिकवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.
नारळाच्या सोडणापासून दोन प्रकारचं उत्पादन निर्माण होतं, एक काथा आणि दुसरं कोकोपीट निर्माण होत. या काथ्यापासून दोरी ,पायपुसणी, काथ्या गाद्या, काथ्यापासून धूप प्रतिबंध सीट्स, गार्डन्स आर्टिकल्स, काथ्या स्टिक, पॉट्स, वेगवेगळ्या प्रकारच्या काथ्याच्या निर्मिती पासून वस्तू बनवू शकतो.
महाराष्ट्रामध्ये कोकोपीटला मार्केट आहे परंतु काथ्याला मार्केट सध्या फार कमी प्रमाणावर आहे. त्यामुळे काथ्यापासून
वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणे फार गरजेचे आहे. तरच त्याला महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर मार्केट उपलब्ध होऊ शकतो.काथ्याला फारस मार्केट नसल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूं बनविण्यामध्ये भर देण्याची गरज आहे. तरच याला मार्केट जिल्ह्यात किंवा जिल्ह्याबाहेर मिळू शकत.
भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काथ्यापासून बनवलेल्या वस्तूंचा वापर आजही केला जातो. काथ्यापासून बनवले गेलेले पॉट्स (काथ्या कुंडी) ते अजूनही दुर्लक्षित आहे.जर या पॉट्स उत्पादनाला ऍसिटिक लूक देऊन बनवले तर त्याला मार्केट उपलब्ध होऊ शकतो.त्यामुळे काथ्या कुंडी बनविण्याच्या मागावर असल्याचं दळवी यांनी सांगितलंय. येणाऱ्या आगामी काळात काथ्या कुंडी बनवणार असून तशी तयारी अंतिम टप्प्यात आहे.
काथ्या आणि कोकोपीट वर्षाला 55 ते 60 टनवर्क एवढां होतो.त्यातून 12 ते 14 टक्के फायदा राहतो.यातून इतर खर्च वजा करून वर्षाला 8 ते 10 लाख रुपये निव्वळ नफा मिळतोय असे दळवी सांगतायत. काथ्या उद्योग हा कमी भांडवल वापरून जास्त नफा देणारा उद्योग आहे. मात्र आजही हा उद्योग दुर्लक्षित राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून या ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. आपल्या जिल्ह्यात काथ्या उद्योजक मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले तर काथ्या उद्योगात आपली वेगळी ओळख निर्माण होईल.एवढा समुद्रकिनारा लाभलेला असताना याचा फायदा आपण करून घेतला पाहिजे, नारळाचे सोडणे हे सोने आहे. त्याची कुठलीच गोष्ट फुकट जात नाही. पण आपण मात्र ते जाळण्यासाठी वापरतो किंवा बाहेर टाकून देता. मात्र याच सोडणांपासून केरळमधील प्रत्येक घरात आज यावर छोटे उद्योग निर्माण झाले आहेत. आपणही याकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे असे दळवी सांगतायत