23.8 C
Panjim
Saturday, February 4, 2023

तीन यात्रा तीन नेते एक ध्यास

- Advertisement -spot_img

१९९९ सालच्या विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा भाग म्हणून गोवा भारतीय जनता पार्टी Bjp Goa ने संपर्क यात्रा काढण्याचे ठरवले. अवघे ४ आमदारांचे बळ असलेल्या ताकदीच्या आधारावर निवडणुकीला सामोरे जायचे होते. श्री. श्रीपादभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली यात्रा झाली. सदर यात्रेचा मार्ग निश्चित करण्याकरीता पेडणे पासून काणकोण पर्यंत ज्या मार्गाने यात्रा जायची त्या मार्गाने काही प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवास केला. सदर यात्रे दरम्यान श्रीपादभाऊंच्या आईचे निधन झाले पण भाऊंनी आवश्यक वेळ काढून सदर यात्रा पूर्ण केली. त्यासालच्या निवडणुकीत भाजपाची ताकद ४ वरून १० झाली. दुर्दैवाने श्रीपादभाऊ ती निवडणुक हरले. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते व म्हणून त्यासाली लोकसभेच्या मध्यावदि निवडणुकीत ते उत्तर गोव्यातून विजयी झाले व ती परंपरा त्यांनी आजही कायम राखली आहे. २०१२ साली स्व. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली अशीच यात्रा काढण्यात आली. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी होती. तोपर्यंत २००० ते २००५ पर्यंत भारतीय जनता पार्टी सत्ताधारी व नंतर २०१२ पर्यंत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कार्यरत होती. श्री. मनोहर पर्रीकर हे गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री व त्यावेळचे विरोधी पक्षनेते होते. त्या पार्श्वभूमीवर ही यात्रा होती. सदर यात्रेपूर्वीसुद्धा मार्ग निश्चित करण्यासाठी प्रवास झालाच. त्या यात्रेत स्व. पर्रीकर यांचा रात्रीचा मुक्काम कार्यकर्त्याच्या घरी असायचा. यात्रा सुरू होण्यापूर्वी तयारीच्या एका बैठकीत त्यांनी आपले जेवण साधे असावे व विशेषतः रात्री चपाती व भाजी पूरे असे सांगितले होते. बोलताना त्यांनी भाजीचे उदाहरण देताना तांबडी भाजी वगैरे चालेल असे म्हटले. पण झाले असे की सगळ्यांना वाटले की भाईंना तांबडी भाजी आवडते व हमखास प्रत्येक ठिकाणी तांबड्या भाजीचा मेनू जेवणात असायचा. नंतर नंतर तर तांबडी भाजीचे नाव घेतले तरी भाईंचा चेहरा लाल व्हायचा. सदर निवडणुकीत भारतीय जनता पार्टीची ताकद १४ वरून २१ झाली व पूर्ण बहुमताने सत्ताधारी बनली. २०२२ साली गोवा विधानसभेची निवडणुक आहे. नुकताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विविध मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. प्रदेश अध्यक्ष श्री. सदानंद तानावडे यांचा संघटनात्मक कामावर भर देऊन दौरा सुरू आहे. स्वाभाविकपणे मुख्यमंत्र्यांचा दौरा हा राजकीय स्वरूपाचा आहे. पण हा दौरा इतर दोन यात्रांपेक्षा वेगळा आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी २०१२ गेली १० वर्षे सत्तेत आहे. स्व. मनोहरभाई पर्रीकर यांच्या निधनानंतर डॉ. सावंत यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. त्यानंतर कोरोना महामारीमुळे दीड वर्ष व्यवस्थित काम करता आले नाही. हे कमी की काय म्हणून तौक्ते वादळामुळे व ४० वर्षानंतर आलेला महापूरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा त्यांना सामना करावा लागला. राजकारणात निवडणुक हे एक न टाळता येणारे सत्य आहे. आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन करण्यासाठी दौऱ्यावर बाहेर पडले आहेत. मुख्यमंत्री म्हणून अवघा अडीच वर्षांचा अनुभव पण पक्षाच्या विजयासाठी त्यांनी कंबर कसली आहे. समाजातील आई, आजोबा, तरुण, शेतकरी, कामगार, महिला, विद्यार्थी व गोमंतकीयांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगून पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद देण्याचे आवाहन ते करीत आहेत. विश्वास आहे की या आवाहनाला गोव्याची जनता निश्चित प्रतिसाद देणार. यात्रा व नेते जरी तीन असले तरी ध्यास मात्र एकच आहे- विकास. गोव्याचा, गोमंताकीयांचा व पर्यायाने देशाचाही!

– नरेंद्र सावईकर

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles