27.2 C
Panjim
Friday, June 18, 2021

गोवा सरकारचा मोठा निर्णय, गोव्यात २१ खासगी रुग्णालये सरकारने घेतली ताब्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची घोषणा

Must read

Remembering the Day when Goa found its nerve for liberation…

Otthra Jun by Manoharrai Sardesai Udok legit zal'lem rogot Ani rogot zal'lem hun Bhava tuka iad asa Otthra Jun? Bondkhonniche dukhest chire Nove axen dhodd'dhoddle Finrgealem mostem bonder Thorthorot somzolem Vavzhoddint vetlem mhonnun Pinzun Pinzun Bhava...

Deaths due to oxygen shortage have been swept under the carpet by BJP Govt: AAP

Panaji: Aam Aadmi Party has attacked the Bharatiya Janata Party for trying to bury the issue of deaths due to oxygen shortage that took...

254 new infections, six died due to covid-19 in Goa on Thursday

Panaji:   Goa's coronavirus caseload went up by 254 and reached 1,63,612 on Thursday  , a health department official said.  The death toll mounted to 2,969...

“REPOSITION GOA” is a movement says GFP President Vijai Sardesai

Margao: Goa Forward Party President, Vijai Sardesai has encouraged all Goans to put forward their ideas on how they envision Goa to be governed...
- Advertisement -

सिंधुदुर्ग – गोवा राज्यातील २१ खासगी रुग्णालये सोमवार दिनांक १७ मे सरकार ताब्यात घेणार असल्याची घोषणा मुखमंत्री डॉ. प्रमोश सावंत यांनी केली आहे. सोमवार पासून या रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याचे अधिकार सरकारने आपल्याकडे घेतले आहेत. असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. गोव्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत असताना सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

२१ खासगी रुग्णालयातील निम्म्या खाटा सरकारच्या ताब्यात

दीनदयाळ स्वास्थ्य योजनेत कोविड उपचार समाविष्ट केल्यानंतर खासगी रुग्णालयांनी या योजनेंतर्गत उपचार देणे नाकारले होते. त्यासाठी रुग्णालयात रुग्णांना खाटा नाहीत असे कारण देऊन वाटेला लावण्यात येत होते. सरकारकडे तशा तक्रारी येत होत्या. त्यामुळे कोविडचे उपचार देत असलेल्या २१ खासगी रुग्णालयातील निम्म्या खाटा सरकार ताब्यात घेणार आणि सोमवारपासून त्या रुग्णालयात कोविड उपचारासाठी रुग्ण दाखल करून घेण्याची प्रक्रिया सरकार आपल्या ताब्यात घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आरोग्य सचिव रवी धवन, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, आरोग्य संचालक डॉ. जुझे डिसा व इतर डॉक्टर उपस्थित होते.

खासगी रुग्णालयातील ५० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध

मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यातील सरकारी रुग्णालयांच्या खाटा कोरोना रुग्णांसाठी कमी पडत असल्यामुळे खासगी रुग्णालयातील ५० टक्के खाटा कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध कराव्यात. तसेच डीडीएसवायचा लाभ गोवेकरांना कोरोना उपचारासाठी द्यावा. अशी सूचना करण्यात आली होती. मात्र, वारंवार सूचना करूनही अनेक रुग्णालयांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यास चालढकल सुरू केली. काहींनी कोरोना रुग्णांना दाखल करून घेतले. मात्र, बिले भरमसाठ लावली. त्यामुळे शेवटी सरकारने खासगी रुग्णालयांवर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने ती २१ ही खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे ठरवले आहे. १७ मे पासून राज्यातील २१ ही खाजगी रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया सरकारकडे असेल, तर रुग्णालयांचे व्यवस्थापन त्या खासगी रुग्णालयांकडेच राहणार आहे. त्या रुग्णालयात जे यापूर्वी रुग्ण दाखल असतील त्यांच्यासाठी ५० टक्के खाटा सोडण्यात येतील व उर्वरित ५० टक्के खाटांचा ताबा सरकार आपल्याकडे घेणार आहे. खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी कायम राहणार असून सरकारने दाखल करून घेतलेल्या कोरोना रुग्णावर तेच उपचार करतील. सरकारचे डॉक्टर तेथे जाणार नाहीत. असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मृत्यू टाळण्यासाठी सरकार प्रयत्नशील

राज्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी व विविध कारणांमुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी सरकार सर्वप्रकारचे प्रयत्न करत असून अनेक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये आज ३५० गंभीर कोरोना रुग्णांना हलवण्यात आले आहे. तेथे अत्याधुनिक ऑक्सिजन यंत्रणा उपलब्धत आहे. पंतप्रधान आरोग्य सेवा अंतर्गत हे रुग्णालय बांधण्यात आले असून अद्याप त्याचे उद्‍घाटन करण्यात आलेले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

पॉझिटिव्ह होण्याची टक्केवारी ५० टक्यांवरून आता ३५ टक्यांवर

गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या कोविड वार्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना ऑक्सीजनचा पुरवठा योग्य तऱ्हेने व्हावा यासाठी २० हजार किलो लीटर ऑक्सीजनची टाकी कार्यान्वित करण्यात आली. असे सांगतानाच राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी वाढलेली असून पॉझिटिव्ह होण्याची टक्केवारी ५० टक्यांवरून आता ३५ टक्यांवर आली आहे. हा दर येत्या काही दिवसांमध्ये आणखी खाली येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest article

Remembering the Day when Goa found its nerve for liberation…

Otthra Jun by Manoharrai Sardesai Udok legit zal'lem rogot Ani rogot zal'lem hun Bhava tuka iad asa Otthra Jun? Bondkhonniche dukhest chire Nove axen dhodd'dhoddle Finrgealem mostem bonder Thorthorot somzolem Vavzhoddint vetlem mhonnun Pinzun Pinzun Bhava...

Deaths due to oxygen shortage have been swept under the carpet by BJP Govt: AAP

Panaji: Aam Aadmi Party has attacked the Bharatiya Janata Party for trying to bury the issue of deaths due to oxygen shortage that took...

254 new infections, six died due to covid-19 in Goa on Thursday

Panaji:   Goa's coronavirus caseload went up by 254 and reached 1,63,612 on Thursday  , a health department official said.  The death toll mounted to 2,969...

“REPOSITION GOA” is a movement says GFP President Vijai Sardesai

Margao: Goa Forward Party President, Vijai Sardesai has encouraged all Goans to put forward their ideas on how they envision Goa to be governed...

Congress Party will commemorate 75 years of Goa Revolution Day

Margao: Congress Party in Goa will commemorate 75 years of Goa Revolution Day on Friday 18th June 2021.  All India Congress Committee Incharge  Dinesh...