गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ एअर अलायन्सच्या विमानाने सुरक्षित प्रवास करून यशस्वी चाचणी 9 ऑक्टोबरच्या उद्घाटन कार्यक्रमाकडे तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या लागल्या नजरा

0
56

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी-परूळे येथील सिंधुदुर्ग विमानतळावर आज गोवा ते सिंधुदुर्ग विमानतळ असा 24 मिनिटाचा एअर अलायन्सच्या विमानाने सुरक्षित प्रवास करून यशस्वी चाचणी केली.

सिंधुदुर्ग विमानतळाचं लोकार्पण सोहळा येत्या 9 ऑक्टोबरला असून तमाम सिंधुदुर्ग वासियांच्या नजरा या उद्घाटन कार्यक्रमात लागल्या आहेत.

तब्बल वीस वर्षानंतर सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पुर्ण झाले आहे. त्यामुळे शनिवार 9 ऑक्टोबरला सिंधुदुर्ग विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी, आयआरबी व एअर अलाईन्स विमान कंपनीने नियोजन केले आहे. विमानतळ लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमिवर दोन दिवस आधीच गोवा ते सिंधुदुर्ग असा एअर अलायन्सच्या विमानाने अवघ्या 24 मिनिटांचा प्रवास केला. यावेळी पायलटसह टेक्निकल स्टाप विमानासोबत होता.

यावेळी विमानात इंधन भरण्याचे प्रात्यक्षिकही झाले. त्यानंतर एका तासाने अलायन्स एअरचे विमान सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवरून टेक ऑफ घेत पुन्हा गोव्याच्या दिशेने झेपावले. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here