कोंडये येथील काजू बागेत बिबट्या वावर एक व्यक्ती बिबट्यापासून काही अंतरावर

0
10772

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात बिबट्याचे वावर दिवसंदिवस वाढू लागले आहे.कणकवली तालुक्यातील कोंडये गावातील फांदीचा माळ येथे काजू बागेत सोमवारी सायंकाळच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडले. विशेष म्हणजे बिबट्या अगदी शांत स्थितीत होता. बिबट्या दिसल्याचे कळताच ग्रामस्थांनीही तेथे धाव घेतली. ग्रामस्थ अगदी काही फुटांवर असून देखील बिबट्या शांत होता. कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर यांना हा बिबट्या सर्वप्रथम दृष्टीस पडला. एरव्ही बिबट्या दिसला की सर्वांची पळापळ होते. पण हा बिबट्या अगदी शांतपणे पाऊले टाकत होता. त्यामुळे काही ग्रामस्थांनी धाडस करून बिबट्याचे फोटो, व्हिडिओ देखील घेतले. जवळपास पंधरा मिनिटे बिबट्या तेथे होता. त्यानंतर तो जंगलच्या दिशेने निघून गेला. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे वनक्षेत्रपाल अमित कटके आपल्या सहकाऱ्यांसह दाखल झाले. वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. बिबट्या इतका शांत स्थितीत का आहे, याचे उत्तरही शोधण्यात येणार असल्याचे वन विभागातर्फे सांगण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी कोंडये ग्रामपंचायतीतर्फे वनविभागाकडे करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ,कोंडये येथील फांदीचा माळ येथील काजू बागेत सोमवारी सायंकाळी एका नर बिबट्याचे दर्शन ग्रामस्थांना झाले. बिबट्या दिसल्याचे कळताच अनेकांनी धाव घेतली. काहींनी धाडस करून बिबट्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील घेतले. जवळपास १५ ते २० मिनिटे बिबट्या त्या परिसरात होता. वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. मात्र, बिबट्या दिवसा ढवळ्या वस्तीनजीक दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंधुदुर्गात बिबट्यांची संख्या वाढली आहे. जंगलानजीक लोकवस्ती असलेल्या भागात बिबट्यांचा वावर अधून मधून असतो. बिबट्यांना भटके कुत्रे भक्ष म्हणून सहज उपलब्ध होत असल्याने बिबटे अधून मधून दर्शन देऊ लागले आहेत. सोमवारी सायंकाळी कोंडये येथील मुख्य रस्त्याच्या बाजूच्या काजू बागेत बिबट्याचे दर्शन झाले आणि एकच धावपळ उडाली. कोंडये सरपंच ऋतुराज तेंडूलकर यांच्या दृष्टीस हा बिबट्या पडला. त्यानंतर ग्रामस्थांना समजताच त्यांनीही त्या परिसरात धाव घेतली. हा बिबट्या शांतपणे पावले टाकताना दिसत होता. एकव्यक्ती तर त्या बिबट्यापासून काही अंतरावर असल्याचे फोटोत दिसत आहे. त्यानंतर तो बिबट्या जंगल परिसरात निघून गेला. कणकवली वनविभागाला याबाबतीची माहिती मिळताच वनकर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले आहेत.याबाबत कणकवलीचे प्रभारी वनक्षेत्रपाल अमित कटके यांच्याशी संपर्क साधला असता बिबट्यांची संख्या वाढली आहे. भटक्या कुत्र्यांना भक्ष करण्यासाठी बिबटे लोकवस्ती नजीक येतात. ग्रामस्थांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. मात्र, मंगळवारी दिवसभरात बिबट्या कॅमेरात कैद झालेला नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त त्या परिसरात सुरू असल्याचे श्री. कटके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here