कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे सक्तीच्या रजेवर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची कारवाई

0
321

 

सिंधदुर्ग – भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी ३० जुलै पर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविले आहे. त्यांचा पदभार रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेलकर यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी याच भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी करण्यासाठी गुरुवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्य समिती नियुक्त केली होती. तर आज खरमाळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले आहे.

कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या मालकांना शासनाने मंजूर केलेला मोबादला देण्यासाठी कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील अधिकारी पैसे मागत असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला होता. आपल्या मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा देत याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यानंतर 30 जूनला कुडाळ शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी चौकशी करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केली होती.तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या लेखी निवेदनात या प्रकारणाची ऑडियो क्‍लिप आहे. ज्या बँकेत हे पैसे जमा होणार होते, तेथील कर्मचाऱ्याने नुकसान रक्कम न मिळण्यात बँकेचा दोष नाही. प्रांत कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पैसे मागत आहेत, असे नमूद करण्यात आले होते. याची गंभीर दखल घेत मंजूलक्ष्मी यांनी चौकशी समिती नियुक्त केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here