कास्टमचा माईन गावात छापा, बंदुकीचे छरे आले आढळून

0
130

कणकवली – कस्टम अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत माईन येथील एका इसमकडून बंदुकीचे छेरे मिळून आले आहेत. संबधित व्यक्तीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेला वन्यजीव असल्याची खबर मिळाली असल्याने ही धाड टाकण्यात आली होती मात्र कोणतीही संशयास्पद गोष्ट या व्यक्तीकडे आढळून आली नसल्याचे संबधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

तालुक्यातील माईन गावातील एका संशयित व्यक्तीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी असलेला वन्यजीव असल्याची खबर कस्टम विभागाला मिळाली होती. यानुसार कास्टमचे अधीक्षक अभिजित भिसे यांच्या नेतृत्वाखाली निरीक्षक राजेश लाडे, अमोल चित्रांश, दिनेश नीना, श्रवण मेघावाल यांच्या पथकाने सर्च वारन्ट घेऊन संशयिताच्या घरी छापा टाकला. यावेळी संशयितांच्या संपूर्ण घराची झडती घेण्यात आली. तर घराशेजारील बायोगॅसही तपासण्यात आला. घराच्या लगत असलेल्या गोठ्याचीही झडती घेण्यात आली. मात्र बंदुकीच्या छऱ्या पलीकडे काही आढळून आले नाही.

याबाबत कणकवली कस्टम कार्यालयात संबधित संशयितांची कसून तपासणीही करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here