26.6 C
Panjim
Monday, November 28, 2022

कणकवली बिडीओंवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडुन प्रश्नांचा भडीमार सतिश सावंत, संदेश पारकर यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळा कडून बीडीओंना डेडलाईन हळवल सरपंचांना कणकवली बीडीओंनी भाजप प्रवेशाची ऑफर दिल्याचा धक्कादायक आरोप

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – दिगवळे गावातील रस्त्याप्रश्नी शनिवार पर्यतची डेडलाईन दिली जाईल. रविवारी जरी १४४ लागू असले तरी त्या कलमाची पर्वा न करता शिवसेना हा रस्ता खुला करेल. शिवसेनेला मदत करणाऱ्या कणकवली तालुक्यातील सरपंचांना कणकवली पंचायत समितीकडून त्रास देण्याची पद्धत बंद झाली पाहिजे अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा देत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कणकवली गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.
कोणत्याही परिस्थितीत आम्हाला कारणे नकोत. आता मांडलेले तालुक्यातील पाच प्रश्न सोडवा अन्यथा पुढील परिणामास सामोरे जा, असा इशारा जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत व शिवसेना नेते संदेश पारकर यांनी देत आक्रमक भूमिका घेतली. कणकवली तालुक्यातील विविध विषयांवर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची भेट घेतली.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर, माजी सभापती संदेश पटेल, युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे, हळवल सरपंच दिपक गुरव, कळसुली सरपंच साक्षी परब, विधानसभा संघटक सचिन सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ.प्रथमेश सावंत, पोलिस उपनिरीक्षक अनमोल रावराणे, शाखा अभियंता कडुलकर, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.सावंत व श्री.पारकर यांनी दिगवळेतील २३ नंबरला नोंद असलेला रस्ता बंद केल्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. हा रस्ता खुला करा अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने रस्ता खुला करू असा इशारा दिला. यावेळी पारकर यांनी तहसीलदार आर जे पवार यांच्याशी फोनवर संपर्क साधत टोलवाटोलवी नको, यावर ठोस निर्णय द्या अशी मागणी केली. जर सदर रस्ता २३ नंबरला नसेल तर त्यावर खर्च कसा झाला असा सवाल करत सतीश सावंत यांनी या प्रश्नी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी केली. तर तोंडवली बावशी ग्रामसेवक पवार याची चौकशी व्हायला हवी. कणकवली पंचायत समिती भाजपला आंदण दिली आहे का, असा सवाल सतीश सावंत यांनी केला.
तोंडवली बावशीचा ग्रामसेवक हा बीडीओ यांच्या परवानगीशिवाय ३५३ ची केस दाखल करायला गेलाच कसा? तुम्ही परवानगी कशी काय दिली? असा सवाल सावंत यांनी केला. आता जनतेचा उद्रेक झालाय. ग्रामसेवक कागदपत्र देत नसल्यामुळे जनतेचा उद्रेक झाल्याने तो प्रकार घडला. ग्रामसेवकांनी जो भ्रष्टाचार केला तो बाहेर येईल म्हणून कागदपत्र नाकारण्यात आले असा आरोप पारकर यांनी केला. त्यामुळे तोंडवली बावशीच्या ग्रामसेवकाची तातडीने बदली करा. त्याला सक्तीच्या रजेवर पाठवा. अन्यथा सोमवार नंतर तेथे जर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला तर शिवसेना जबाबदार राहणार नाही असा इशारा पारकर व सावंत यांनी दिला.
कणकवली तालुक्यात शिवसेनेला समर्थन करतात त्याच सरपंचाना त्रास देण्याचे काम पंचायत समितीकडून सुरू आहे. कळसुली सरपंच साक्षी परब यांची चौकशी लावून त्रास दिला जात आहे. हळवल सरपंच दीपक गुरव यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर बिडीओनी दिल्याचा गंभीर आरोप पारकर यांनी केला. बीडिओ यांच्या दालनात ही चर्चा सुरू असतानाच सावंत यांनी पोलिस निरीक्षकांना संपर्क साधत शिष्टमंडळ पंचायत समितीमध्ये भेटीला आल्याची माहिती दिली. अन्यथा उद्या आमच्यावर देखील ३५३ चे गुन्हे दाखल केले जातील. यासाठी पोलीस समक्ष उपस्थित ठेवावे अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक अनमोल रावराणे हे पंचायत समितीत दाखल झाले. त्यांनी देखील दिगवळे रस्ता प्रशनी माहिती घेतली मात्र तो रस्ता २३ नंबरला नाही असे त्यांनी सांगितले. त्यावर सतीश सावंत यांनी जर २३ नंबर ला रस्ता नाही तर खर्च कसा पडला असा सवाल केला.
यावेळी पारकर यांनी बीडिओ यांची अवस्था गांधीजींच्या तीन माकडांसारखी झाल्याचा आरोप केला. नुसते आमचे ऐकून घेऊ नका तर ठोस निर्णय घ्या. याप्रश्‍नी अधिकाऱ्यांची हतबलता आम्ही समजू शकतो. मात्र चुकीची कामे करू नका असा सल्ला सावंत यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिला. दरम्यान ज्या ठेकेदारांकडून कामे केली जातात त्यांची बिले वेळेत मिळत नाहीत. मात्र काम न होताच नाटळ जिल्हा परिषद मतदार संघातली बिले काढली गेली असा आरोप सावंत यांनी केला.
सांगवे पामतेल रस्ता, सांगवे विठ्ठल मंदिर, नरडवे भैरवगाव रस्ता या कामांची बिले काढली गेली. मात्र ही कामे अद्याप व्हायची आहेत. एकाच जिल्हा परिषद मतदार संघासाठी हा वेगळा नियम का? कनेडी पशुवैद्यकीय दवाखान्याच्या खिडक्या-दरवाजे न बसवताच बिले का काढली? पामतेल रस्त्याचे ३ लाख, विठ्ठल मंदिर रस्त्याचे ५ लाख, पशुवैद्यकीय दवाखान्याचे २० लाखाची बिले काढली गेली. सर्वच बिले जर बोगस काढली जात असतील तर जिल्ह्यातच ही सिस्टीम राबवा अशी मागणी सावंत यांनी करत आक्रमक भूमिका घेतली. जी कामे न होता बिले काढली गेली त्याची आजच पंचयादी करा त्याबाबत मी लेखी तक्रार देतो असे सावंत यांनी सांगितले. त्यानंतर तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांनी या बाबत लेखी तक्रार दिली.
जिल्हा परिषद अध्यक्षपद स्वतःची बिले काढण्यासाठी की लोकांची कामे करण्यासाठी असा सवाल संदेश पारकर यांनी करत आक्रमक भूमिका घेतली. येत्या चार दिवसात या सर्व प्रश्नांवर आम्हाला निर्णय हवा अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही पारकर व सावंत यांनी दिला.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img