27 C
Panjim
Thursday, August 11, 2022

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने भगवान लोके यांचा सत्कार… कणकवली तालुका पत्रकार संघ बैठक; विविध मुद्द्यांवर झाली चर्चा

spot_img
spot_img

सिंधुदुर्ग -कणकवली पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांना श्रमिक पत्रकार संघ,महाराष्ट्रच्यावतीने कोरोना योध्दा सन्मान जिल्हाध्यक्ष गणेश जेठे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या बैठकीत कोरोना महामारीत तालुक्यातील विविध शासकीय विभागात काम करणाऱ्या व्यक्तींचा कोरोना योद्धा म्हणून प्रातिनिधिक सत्कार करण्याचे ठरवण्यात आले.तसेच पत्रकार पुरस्कार कार्यक्रम नोव्हेंबर अखेरपर्यंत करण्याचे ठरवण्यात आले आहे.

कणकवली तालुका पत्रकार संघाची सभा तालुकाध्यक्ष भगवान यांच्या अध्यक्षतेखाली शिवाई सभागृह येथे पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे,माजी जिल्हाध्यक्ष संतोष वायंगणकर ,जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे, जिल्हा प्रतिनिधी सुधीर राणे,सचिव नितीन सावंत,खजिनदार माणिक सावंत, चंद्रशेखर देसाई,लक्ष्मीकांत भावे, संतोष राऊळ, विवेक संतोष पाटणकर , रंजिता तहसिलदार,राजन कदम, तुषार सावंत संजय बाणे,संजय पेटकर,ओंकार ढवण, उमेश परब, राजन चव्हाण, विराज गोसावी, विनोद जाधव,अनिकेत उचले,आनंद तांबे, मंगेश साळसकर,गणेश पारकर यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते. ही बैठक सोशल डिस्टन्स व शासकीय नियम पाळून घेण्यात आली.
सभेच्या प्रारंभी सिंधुदुर्ग समाचार कोल्हापूरचे संपादक भाऊसाहेब कदम, पत्रकार संघाचे सभासद संतोष जेठे व पत्रकार उदय तावडे यांच्या मातोश्री सरीता तावडे,दैनिक पुढरीचे सेवानिवृत्त कर्मचारी विजय दळवी यांचे निधन झाल्याबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.

कणकवली तालुका पत्रकार संघाच्या वतीने कोरोना महामारीत विविध शासकीय विभागातील ज्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक काम केलं त्यांचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार नावे निश्चित करण्यात आली आहेत.तसेच तालुक्यातील पत्रकारांसाठी ओळखपत्र,नवीन सभासद व अन्य विषयांवर साधक-बाधक चर्चा झाली.
या बैठकीला उपस्थित राहिलेल्या सर्व सभासदांचे आभार भगवान लोके,नितीन सावंत यांनी मानले.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img