सिंधुदुर्ग – ऐन कोरोनाच्या संकटात यावर्षी कोकणातील आंबा सापडला आणि बागायतदारांचे मोठे नुकसान झाले. मात्र आता या पुढच्या काळात एसटी आंब्याची वाहतूक करणार आहे. अशी माहिती खुद्द राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. कणकवली दौऱ्यावर आलेल्या परब यांनी एसटीच्या उत्पादन वाढीसाठी हा निर्णय घेत असल्याचे यावेळी सांगितले. यावर्षी कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था बंद होती. परिणामी कोकणातील आंबा बाजारपेठेत जाऊ शकला नाही. मात्र आता एसटी आंबा वाहतूक सुरु करणार असल्याने बागायतदारांना वाहतुकीचा मोठा पर्याय मिळाला आहे. लवकरच प्रवाशी वाहतुकीची मुदत संपलेल्या एसटी गाड्यांची मालवाहतूक गाड्यांमध्ये रूपांतर करणार असल्याचे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले.
एसटी करणार कोकणातील हापूस आंब्याची वाहतूक, परिवहन मंत्री अनिल परब यांची कणकवलीत माहिती
