27.1 C
Panjim
Tuesday, March 21, 2023

इंधन दरवाढी विरोधात शिवसेना आक्रमक आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये छेडले आंदोलन

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – इंधन दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो!, चले जाव चले जाव मोदी सरकार चले जाव!, अक्कड बक्कड बंबे बो 80,90 पुरे 100, इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे! अशा घोषणा देत कुडाळ येथील प्रांत कार्यालयासमोर आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन छेडले.आ.वैभव नाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेले पेट्रोल डिझेल दरवाढी बाबतचे पत्र यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना देण्यात आले.

गेला महिनाभर सातत्याने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होत आहे. कोरोनाचे संकट कायम असतानाही भाजप सरकारने पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे.ही दरवाढ कोरोनामुळे संकटात असलेल्या लोकांच्या जमखेवर मीठ चोळल्यासारखीच आहे.लॉकडाऊन काळात देशातील नागरिकांचे उद्योग धंदे बंद आहेत.यामुळे नागरिकांचे उत्पन्नांचे स्रोत बंद झालेत.असे असताना लोकांवरील आर्थिक संकट कमी करण्यासाठी महागाई कमी करणे गरजेचे होते. मात्र याउलट पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वच वस्तू महाग होत आहेत.ही दरवाढ रद्द झाली पाहिजे लोकांच्या खिशाला परवडेल एवढा पेट्रोल डिझेलचा दर निश्चित केला पाहिजे असे आमदार वैभव नाईक यांनी म्हटले आहे.अशा आशयाचे पत्रही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.ते पत्र कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना देऊन शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाआहे.

यावेळी शिवसेनेचे कुडाळ तालुका प्रमुख राजन नाईक, जिल्हा परिषद सदस्य अनुप्रिती खोचरे, पं.स.उपसभापती जयभारत पालव, माजी सभापती राजन जाधव, माजी प. स. सदस्य अतुल बंगे, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, तालुकाप्रमुख राजू जांभेकर, योगेश धुरी, बाळू पालव, बबन बोभाटे, गंगाराम सडवेलकर, बाळा कोरगावकर, दिपक आंगणे, कृष्णा तेली, अनुप नाईक,राजु गवंडे, संदीप म्हाडेश्वर, अक्रम साठी, ओंकार दळवी, आदि उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles