आमदार नितेश राणे यांना घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरला रवाना पोलीस बंदोबस्तात वैद्यकीय तपासणीसाठी ताफा कोल्हापूरकडे

0
44

 

सिंधुदुर्ग – शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील संशयित भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचा खासगी सचिव राकेश परब यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान आमदार नितेश राणे यांना वैद्यकीय तपासणी आणि उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले आहे. कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात त्यांना जिल्ह्यातील डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखी नेण्यात येत आहे. पोलीस बंदोबस्तात 108 रुग्णवाहिकेतून नितेश आणि ला घेऊन वैद्यकीय पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले आहे.

कणकवली दिवाणी न्यायालयाने आमदार नितेश राणे यांना शुक्रवारी 18 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान तातडीने नितेश राणे यांच्या वकिलांनी आमदार नितेश राणे आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला आहे. या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने जामीन अर्ज नाकारल्यास मोठा गोंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांना अधिक वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआ रुग्णालयात दाखल केले जात आहे. कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळ पासून सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्ते देखील कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

त्यांना वैद्यकिय तपासणीसाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कोल्हापुरातील कार्यकर्ते सकाळी सीपीआर रुग्णालयात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी धावपळ करत आहेत.

शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी संशयित भाजपचे आमदार नितेश राणे व त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांची पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांन न्यायालयाने दि. 18 फेब्रुवारीपर्यत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकृतीचे कारण पुढे करुन राणे येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here