आमदार नितेश राणे यांचा समर्थक सचिन सातपुतेला अटक, या प्रकरणात अडकवले जात असल्याचा नितेश राणे यांचा आरोप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक हल्ल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई

0
91

सिंधुदुर्ग – जिल्हा बँक निवडणूक प्रचारात 18 डिसेंबर रोजी कणकवलीत शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य संशयीत आरोपी सचिन सातपुते यास गजाआड करण्यात आले आहे. सातपुते याला सिंधुदूर्ग पोलिसांनी दिल्लीमधून मोठ्या शिताफीने अटक केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान या प्रकरणात आपल्याला अडकवले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

सातपुते गेले काही दिवस होता फरार

सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो. त्याने 2017 मध्ये पुणे महापालिकेची निवडणूक भाजपकडून लढविली होती. संतोष परब यांच्यावर हल्ला केल्यानंतर सचिन सातपुते त्याचा मोबाईल फोन बंद करून होता फरार झाला होता. या आधी या प्रकरणात एकूण चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नितेश राणे यांची याच प्रकरणी कणकवली पोलिसांनी चौकशीही केली आहे.

या प्रकरणात आपल्याला अडकवले जाते

दरम्यान संतोष परब यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या प्रकरणात आपल्याला जाणीवपूर्वक अडकवले जात असल्याचा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. जिल्हा बँक निवडणुकीत भाजपप्रणीत पॅनल ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महा विकास आघाडीच्या नेत्यांकडून संतोष परब खुनी हल्ला प्रकरणात आपली चौकशी करून या प्रकरणांमध्ये आपल्याला गुंतवले जात आहे. असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विट केला आहे.

नितेश राणे यांची जिल्हा पोलिसांनी केली होती चौकशी

नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामनामधून कठोर टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. त्या वेळी पुण्यातील `सामना` कार्यालय फोडण्याच्या आरोपामध्ये सचिनला अटक करण्यात आली होती. त्याला अटक होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात राजकीय दबाव पोलिसांवर होता. नितेश राणे यांची पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली होतीअतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्ष, उपअधीक्षक, पोलिस निरीक्षत अशा तिघांनी पाऊण तास ही चौकशी केली. या चौकशीला आपण सर्वतोपरी सहकार्य केल्याचे राणे यांनी नंतर सांगितले.

काय झालं होतं त्यावेळी

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब यांच्यावर अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here