सिंधुदुर्ग – आंबोलीत पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पंधरा पर्यटकांवर आंबोली पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात पर्यटनावर बंदी असताना हे पर्यटक आंबोलीत पर्यटन स्थळावर दाखल झाले होते.
आंबोलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही रवीवारी दुपारपर्यत येथे आलेल्या पंधरा पर्यटकांवर कार्यवाही करण्यात आली असल्याची माहीती हवालदार दत्तात्रय देसाई यांनी दिली.
तसेच चौकुळ आणि गेळे येथील ही पर्यटन स्थळांवर पर्यटकांना फिरण्यास अटकाव करण्यात आला आहे. या पर्यटन स्थळांवर पर्यटक फिरताना आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी चौकुळ आणि गेळे सरपंच यांनी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात पत्राद्वारे केली आहे.



