सिंधुदुर्ग : अवैध धंद्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा या मागणीकरिता कणकवली तालुका कॉंग्रेस अध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी कणकवली पोलिस स्टेशन बाहेर उपोषण सुरू केले आहे.
वागदे येथील सोशल क्लब वर कारवाई सोबतच या सोशल क्लबच्या स्पर्धेदरम्यान उपस्थित असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील श्री मांजरेकर यांनी यापूर्वी पालकमंत्री उदय सामंत व पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.
मात्र त्यावर कारवाई झाली नसल्याने श्री मांजरेकर यांनी उपोषण केले. त्यावेळी जिल्हा सरचिटणीस महींद्र सावंत, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण वरूनकर, शहराध्यक्ष महेश तेली, प्रदीपकुमार जाधव, संदीप कदम आदी उपस्थित होते.