भाजपने 30 तारखेला बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा येणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास यांनी दिली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची नेता म्हणून निवड केली जाणार असल्याचेही व्यास यांनी म्हटले आहे. दिवाळीनंतर राज्यातील सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग येणार आहे. येत्या 30 तारखेला भारतीय जनता पक्षाच्या नवीन आमदारांसह प्रदेशातील कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक मुंबईला बोलावण्यात आली आहे. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सह गृहमंत्री अमित शाहा,यांच्यासह सरोज पांडे उपस्थित राहणार आहेत.या बैठकीत भाजपच्या आमदार गटाचा नेता निवडला जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड निश्चित मानली जात असल्याचे व्यास यांनी म्हटले आहे. भाजपने या निवडणुकीत 150 जागेवर आपले उमेदवार उतरवले होते. त्यापैकी 105 उमेदवारांना निवडून आणण्यात भाजपला यश मिळाले आहे. जर भाजप यावेळी संपूर्ण 288 जागांवर निवडणूक लढली असती तर निकालाचे चित्र हे 2014 पेक्षा बरेच वेगळे असते असा दावा व्यास यांनी केला.
अमित शहा उद्या मुंबईत, देवेंद्र फडणवीस यांची होणार भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी निवड
