अखेर मालवनमधील त्या अपघातग्रस्त वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू

0
68

सिंधुदुर्ग – बाजार आटोपून घरी परतणाऱ्या मालवण भरड येथील तारामती विष्णू परकर (वय-७५ ) या पादचारी वृद्ध महिलेला मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली.

हा अपघात शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान भरड भागात घडला.

कोल्हापूर येथील सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टची गाडी (क्रमांक एम. एच. ०९-बीसी-९८१५) ही घेऊन चालक सचिन कांबळे हा सहकारी बाबू खलीफ याच्या समवेत मालवण येथे कापड, रंग साहित्याचा माल घेऊन आले होते.

ते भरड भागातून बाजारपेठ येथे जात असता भरड येथील मुख्य रस्त्यावर बाजारातून घरी परतणाऱ्या तारामती परकर या वृद्ध महिलेच्या डाव्या पायावरून गाडीचे मागील चाक गेले.

यात ती वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली होती. तिला तातडीने कुडाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

कुडाळ येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या तारामती परकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here