सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यातील चिंदर येथील सुब्रमण्यम भालचंद्र केळकर याने UPSC परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. त्याने आपल्या यशातून चिंदर गावाबरोबरच मालवण तालुक्याचे नाव उज्ज्वल केले असून सुब्रमण्यमच्या यशाबद्दल आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी त्याच्या चिंदर येथील घरी भेट देत पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक,भाऊ परब, चिंदर उपविभाग प्रमुख अनिल गावकर, दिनेश गोरे, समीर हडकर, चिंदर उपसरपंच श्रीकांत बागवे, ग्रा. पं. सदस्य समीर लब्दे, संजय हडपी, युवासेना विभागप्रमुख नितीन घाडी, मिलिंद चिंदरकर, संजय केरकर, विनायक परब, हरी साटम आदी उपस्थित होते.



