सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त कोरोना रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याचा सरासरी रुग्णसंख्या दर ०.४७ टक्के असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रुग्णसंख्या दर २.०१ टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सध्या रेडझोन मध्ये असून , रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या आठवड्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट राज्यात सर्वाधिक ३१.३६ टक्के इतका होता. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा रेडझोन मध्ये दाखल झाला असून, जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांना चा दर दिवसेंदिवस वाढत आहे.
कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने खारेपाटण , करूळ , आंबोली , गोवा जिल्ह्यातील सीमा आजपासून बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यापूर्वी जिल्हा बाहेरून किंवा परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश दिला जात होता. मात्र वाढत्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर आज पासून या सर्व सीमा पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत. मुख्यत्वे: एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर किंवा आजारी असल्यास जिल्ह्यात येण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाने वारंवार करूनही लोक गंभीरतेने घेताना दिसले नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनतेला दिलेली सूट हीच लोकांच्या बेशिस्तीच्या वागण्याने समाजासाठी प्राणघातक ठरू नये या साठी पोलिस यंत्रणा झगडत आहे. वैद्यकीय यंत्रणा जीवावर उदार होऊन रात्रंदिवस सेवा करण्यात गर्क आहे.



