सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये खासगी पद्धतीने सेवा देणाऱ्या २७२ आरोग्य कर्मचाऱ्यांना सेवा थांबवण्यात आली आहे.
आता तिसरी लाट येणार असल्याची एकीकडे सरकार सांगत आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येणार आहेत.
त्यामुळे कोरोना संसर्ग वाढल्यास कोविड सेंटर बंद केल्यास उद्या रुग्णांना सेवा कशी मिळणार?आता सेवेतून डॉक्टर, आरोग्यसेविका,वार्ड बॉय यांना कमी करणाऱ्या ठाकरे सरकारचे डोकं ठिकाणावर आहे का?
तिसऱ्या लाटेत जिल्हा आरोग्य विभाग काय करणार?पालकमंत्री, खासदार, आमदार गप्प राहून जनतेच्या आरोग्याशी खेळणार का?असा सवाल मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला आहे.
तर या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे,यासाठी मी मनसेच्या वतीने आरोग्य मंत्री व आरोग्य सचालकांना पत्र देणार आहे. असे ते म्हणाले
कोकणी जनतेला शासन व लोकप्रतिनिधी फसवतात. कोकणी जनतेचे जीव गेले तरी फरक पडत नाही.
इथला मंत्र्यांनी काढलेल्या कर्मचाऱ्यांना मुदत वाढ द्यावी,पुन्हा कोविड सेंटर चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केला.