हापूसवरील निर्यात शुल्क झाले शून्य, अमेरिकेत जाण्याचा मार्ग झाला सुकर

0
2

मुंबई – यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन घटणार असले तरी भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी वाणिज्य करारानंतर आंबा निर्यातदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेने भारतीय आंब्यावरील १८ ते ५० टक्के असलेले निर्यात शुल्क शून्य टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे यंदा तीन लाखांहून अधिक हापूसच्या पेट्यांची परदेशवारी होणार आहे. ही निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असेल. ५ एप्रिल ते ५ जूनपर्यंत दररोज पाच हजार पेट्या अमेरिका, युरोप आणि आखाती देशात जातील.

व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले की,१० ते १५ मार्चनंतर मार्केटमध्ये आंब्याची आवक नियमितपणे सुरू होईल. १५ एप्रिलनंतर खऱ्या अर्थाने आंब्याचा मोठा हंगाम पाहायला मिळेल. प्रति किलो आंब्याला विमानाचे भाडे ४०० रुपये आकारले जाते. अमेरिकेत कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क, मियामी, लॉस एंजेलिस, टेक्सास, शिकागोसह १५ शहरांत हापूस पाठवला जातो.

लंडन तसेच आखाती देशात आणि आता नव्याने ऑस्ट्रेलियात हापूससाठी बाजारपेठ उपलब्ध झाली असून, तेथून कोकण हापूसला मागणी आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here