मुंबई – उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नव्या राष्ट्रीय अघ्यक्ष होतील यावर सोमवारी शिक्कार्मोतब झाले असून येत्या २६ फेब्रवारीला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येईल अशी माहिती हाती आली आहे. सोमवारी उपमुख्यमंत्र्यांच्या देवगिरी बंगल्यावर एक बैठक झाली. या बैठकीमघ्ये सुनेत्रा पवार यांचे नाव प्रफुल्ल पटेल यांनी सर्वांसमोर ठेवले. त्यांच्या नावाला उपस्थित सर्वांनी एक मुखी पाठंबा दिला. बैठकीला उपस्थित असलेले पक्षाचे आमदार खासदार आणि अन्य प्रमुख नेत्यांनी हात वर करून सर्मथन दिले.
आता औपचारिकता बाकी राहिली असून ती २६ फेबु्रवारीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पुर्ण केली जाईल. त्यानंतर सुनेत्रा पवार त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाईल. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांचीच निवड करावी अशी मांगणी बहुतांश नेत्यानी केली होती. कार्यअध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी देखील आपले देखील तेच मत असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभुमीवर सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख पदाधिकार्यांसह आमदार आणि खासदारांची बैठक बोलवण्यात आली होती. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बंगल्यावर ही बैठक झाली. त्याला सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या. या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली. येत्या २६ फेबु्रवारीला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचे अधिकृतपणे जाहिर करण्यात येईल.



