सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रोणापाल येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपी शाजी वासू (वय २७) रा आर्लम फार्म, केरळ याला ओरस जिल्हा न्यायालयाने दोषी ठरविले आहे.
जिल्हा न्यायाधिश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधिश प्रकाश कदम यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
१९ जानेवारी २०१७ च्या रात्री शाजी वासू याने सोबतच्या सहकाऱ्यांबरोबर भांडण उकरून त्यांच्यावर कोयत्याने वार केले होते. पत्नीला अनैतिक संबंधाबाबत विचारणा केल्याच्या रागातून हा जीवघेणा हल्ला त्याने केला होता. यावेळी रवींद्रन विल्ली व चंद्रन चोमन या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोर्टाने आरोपीला जन्मठेप सुनावली आहे. दुसरा संशयित आरोपी संतोष विल्ली (३२) याला न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. संतोष विल्ली याच्या वतीने ऍड अमोल सामंत यांनी काम पाहिले तर सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता सूर्यकांत खानोलकर यांनी काम पाहीले.