सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातल्या सरपंचांची गणेशोत्सव पार्श्वभूमीवर विशेष बैठक

0
373

 

सिंधदुर्ग – सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा अधिक वेगाने वाढत असून ऐन तोंडावर आलेल्या गणेश चतुर्थी उत्सवावर याचा परिणाम होऊ नये व कोकणात येणारे चाकरमानी तथा गणेश भक्त आनंदाने सण साजरा करावे या पार्श्वभूमीवर खारेपाटण दशक्रोशातील सर्व सरपंचांची नियोजना संदर्भातील एक विशेष बैठक खारेपाटण ग्राम सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच ग्रामपंचायत कार्यालय खारेपाटण येथे घेतली. सोशल डिस्टिंगचे नियम पाळून हि बैठक पार पडली. या सभेला खारेपाटण गावाला लागून असलेल्या कणकवली, देवगड व वैभववाडी तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील गावातील प्रमुख मोजकेच सरपंच उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या गावी गणेश चतुर्थी साठी येणाऱ्या चाकरमानी व गणेश भक्तांना किमान 14 दिवस कॉरंटाईन होणे बंधनकारक असेल असे ठरविण्यात आले. तर खारेपाटण बाजारपेठेत दशक्रोशीतल नागरिक जिल्यात कुठेही कॉरंटाईन झाले असल्यास त्यांनी 14 दिवस कॉरंटाईन कालावधी पूर्ण केला असल्याचे पत्र सोबत आणावे. याच बरोबर सर्वांनी शासनाच्या अटी व नियमांचे पालन करावे असे ठरविण्यात आले.

कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर आपआपल्या गावी येणाऱ्या चाकरमानी व गणेशभक्तांची आपण योग्य ती काळजी घेऊया, मात्र शासनाने गावपातळीवर ग्रामनियंत्रण समितीला दिलेल्या अधिकाराचा गैर वापर न करता शासनाच्या अटी व नियमांना अधीन राहून सर्वांनी मिळून काम करूया व कोरोनाला हद्दपार करण्यासाठी शासनाला सहकार्य करुया या सभेत ठरविण्यात आले.

खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यावेळी म्हणाले खारेपाटण गावावर आणि बाजारपेठेवर अवलंबून असलेल्या गावच्या सरपंचांची आम्ही सभा घेतली. या सभेला २५ सरपंच उपस्थित होते. त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातले १० सरपंच उपस्थित होते. या गावातील बँकिंग व्यवहारही खारेपाटनवर अवलंबून आहेत. शासनाच्या निकषानुसार येथील पोलीस चेकपोस्टवर येणाऱ्या अडचणी दूर करा अशी या सरपंचांची मागणी आहे. याबाबत आम्ही पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांच्याशी बोलणार आहोत असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here