सिंधुदुर्ग बँकेचा व्यवसाय ७१७६ कोटींवर : अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली माहिती

0
4

सिंधुदुर्ग बँकेचा व्यवसाय ७१७६ कोटींवर : अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली माहिती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३८ वर्षांत ४२०० कोटींचा व्यवसाय गाठल्यानंतर, विद्यमान संचालक मंडळाने अवघ्या ४ वर्षांत ३००० कोटींची भर घालत ३१ मार्चअखेर एकूण व्यवसाय ७१७६ कोटींवर पोचला असून पुढील दोन वर्षात दहा हजार कोटी चा टप्पा पूर्ण करण्याचा व ग्राहकांना दर्जेदार घरपोच बँकिंग सेवा देण्याचा  संकल्प असल्याचे सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

बदलत्या आर्थिक परिस्थितीशी सुसंगत राहून आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत ग्राहकाभिमुख सेवा देण्यावर भर देण्यात आला.एकूण व्यवसाय: ४२००.६८ कोटींवरून ७१७६ कोटी,  ठेवी: २०६३.३० कोटींवरून ३१४२.१० कोटी, कर्जवाटप: २०१४.२ कोटींवरून २३६४ कोटी, निव्वळ नफा: १६ कोटींवरून ५० कोटी, या चार वर्षांत बँकेच्या सर्व आर्थिक घटकांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. व्यवसायात दुप्पटपेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली आहे. बँकेला सातत्याने ‘अ’ दर्जा प्राप्त होत असल्याने तिची आर्थिक स्थिती अधिक सक्षम आणि विश्वासार्ह ठरली आहे. असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here