जिल्ह्यात आज रोजी 338 व्यक्ती अलगीकरणात असून त्यापैकी 271 व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. तर संस्थात्मक अलगीकरण कक्षात 67 व्यक्तींना ठेवण्यात आले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत मिरज येथे 228 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 209 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून 19 नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे. विलगीकरण कक्षात सध्या 62 रुग्ण दाखल आहेत. तर आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी 2277 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्हा रुग्णालयामार्फत थालासेमिआचे 10, डायलेसिसचे 42 व केमो थेरपीचा एक रुग्ण सेवा घेत आहेत. जिल्ह्यातील निवारा केंद्रातील 264 व्यक्तींची तपासणी करुन त्यांचे सामुपदेशन करण्यात आले.
अ.क्र विषय संख्या
1 घरीच अलगीकरण करण्यात आलेले 271
2 संस्थात्मक अलगीकरणात असलेले 67
3 पाठविण्यात आलेले एकूण नमुने 228
4 अहवाल प्राप्त झालेले नमुने 209
5 आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने 1
6 निगेटीव्ह आलेले नमुने 208
7 अहवाल प्राप्त न झालेले नमुने 19
8 विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 62
9 सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण 00
10 आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती 2277