सिंधुदुर्ग – मुंबई गोवा महामार्गावर सिंधूदुर्ग जिल्ह्यात सलग दोन दिवस अपघातांची मालिका सुरु आहे. झाराप पत्रादेवी बायपासवर आज शनिवारी झालेल्या अपघातात झायली कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघात दोन जखमींना 108 रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेत असताना या रुग्णवाहिकेने पेटघेतल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कोकण दौऱ्यावर असतानाच हि अपघातांची मालिका सुरु झाली आहे.
बांदा येथून कणकवलीच्या दिशेने फटाके घेऊन जात असलेल्या झायलो कारला नेमळे येथे अपघात झाला. टायर फुटल्याने गाडी दुभाजकाच्याच्या पलीकडे पलटी खाल्ल्याने झालेल्या या अपघातात दोघेजण जागीच ठार तर इतर जखमी झाले.
त्यानंतर स्थानिकांनी मदतकार्य करत बांदा येथील 108 रुग्णवाहिकेतून अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेत असताना काही अंतरावर रुग्णवाहिकेने पेट घेतला. सुदैवाने आतील रुग्ण, रूगनवाहिका चालक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना बाहेर काढन्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला.त्यानंतर दुसरी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान जळालेल्या रुग्णवाहिकेतील सिलेंडरचा प्रचंड मोठा स्फोट झाला. काही काळ या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची भली मोठी रांग लागली होती.
काल कणकवलीत घडले दोन भीषण अपघात
महामार्गाच्या अपूर्ण कामांमुळे काळ शुक्रवारी ( दि. २६ ) रोजी कणकवली वागदे येथे दोन भीषण अपघात झाले. पहिला अपघात दुपारी घडला. या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर दुसरा अपघात रात्रीच्या सुमारास झाला. ता अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी महार्गाच्या एका लेनचे काम अपूर्ण असल्याने सर्व वाहतूक एकाच लेनवरून वळविण्यात आली आहे.



