सोमवारी आणखी नऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे जिल्हय़ात कोरोना रुग्णांची संख्या 130 वर गेली आहे. नव्याने आढळलेल्या रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील तीन, मालवण तालुक्यातील दोन, वेंगुर्ले तालुक्यातील एक आणि सावंतवाडी तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना बाधित असलेल्या एकूण रुग्णांपैकी आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण 22 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान कणकवली तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहे. या तालुक्यातील रुग्णसंख्येची वाटचाल अर्धशतकाकडे (44) सुरू आहे.
जिल्हय़ात 7 जूनपर्यंत कोरोना बाधित 121 रुग्ण आढळले होते. सोमवारी आणखी नऊ रुग्ण आढळल्याने एकूण रुग्ण संख्या 130 वर गेली आहे. नव्याने आढळलेल्या सहा रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील घोणसरी गावातील दोन, तळेरे येथील एक, मालवण तालुक्यातील तळगाव येथील एक, कट्टा येथील एक, वेंगुर्ले तालुक्यातील आसोली गावातील एक, सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड गावातील दोन आणि ओवळिये गावातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्हय़ात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारासाठी मुंबईला गेला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत 105 रुग्ण औषधोपचाराखाली आहेत.
जिल्हय़ात सध्या कणकवली तालुक्मयातील पुढीलप्रमाणे कंटेनमेंट झोन आहेत. हळवल येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळवल नं. 1, कलमठ येथील जि. प. प्राथमिक शाळा कलमठ कुंभारवाडी, तळेरे, नाटळ, कुरंगवणे, नवीन कुर्ली वसाहत, जानवली गावातील घरटणवाडी येथील प्राथमिक शाळा, शेर्पे येथील बौद्धवाडी, शिवडाव, डामरे, वारगाव येथील धुमकवाडी, हरकुळ बुद्रुक येथील कांबळेवाडी, आईनतळवाडी, व्हावटवाडी, बीडवाडी हायस्कूल व आवार, कासार्डे येथील धुमाळवाडी, हरकुळ खुर्द येथील गावठण, तांबळवाडी, वरचीवाडी, गायकवाडवाडी, बावशी येथील शेळीचीवाडी, पियाळी येथील गावठण. वैभववाडी तालुक्मयात भुईबावडा बौद्धवाडी, पहिलीवाडी, तळीवाडी, वेंगसर बंदरकरवाडी, तिरवडे तर्फ सौंदळ घागरेवाडी, कोळपे व मेहबुबनगर, ब्राह्मणदेववाडी, उंबर्डे आणि कोकिसरे पालकरवाडी हे कंटेनमेंट झोन आहेत. सावंतवाडी तालुक्मयात कारिवडे गावठणवाडी, माडखोल बामणादेवीवाडी, निरवडे माळकरवाडी, बांदा गाव गवळीटेंबवाडी, असनिये येथील भटवाडी, धनगरवाडी, वायंणवाडी, चौकुळ अंतर्गत पाटीलवाडी, देऊळवाडी, जुवाटवाडी, खासकीलवाडी, तोरसवाडी, घोणसाटवाडी, मधलीवाडी, सातोसे-दुर्गवाडी या ठिकाणी कंटेनमेंट झोन आहेत. कुडाळ तालुक्मयात उपवडे दातारवाडी, पणदूर-मयेकरवाडी, आंब्रड वरची परबवाडी, तांबेवाडी, टेंबवाडी, पडवे पहिलीवाडी, गावराई टेंबवाडी, रानबांबुळी पालकरवाडी, हिर्लोक खालची परबवाडी, साळगाव लुभाटवाडी हे कंटेनमेंट झोन आहेत. मालवण तालुक्मयात चिंदर देऊळवाडी, गावडेवाडी, शाळा गावठाणवाडी, बागवाडी, गोसावी मठ, हिवाळे, सुकळवाड राऊळवाडी व ठाकरवाडी. वेंगुर्ले तालुक्मयात मातोंड. देवगड तालुक्मयात शिरगाव धोपटेवाडी, नाद भोळेवाडी, नाडन मिराशीवाडी. दोडामार्ग तालुक्मयात कुंब्रल वरचावाडा येथील जि. प. शाळा कुंब्रल नं. 1, कसई, वनविभाग विश्रामगृह परिसर असे कंटेनमेंट झोन आहेत