सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीत ७ सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन, स्थानिकाकडून स्वागत

0
246

सिंधुदुर्ग – तळकोकणातील मुख्य पर्यटन स्थळ असलेल्या आंबोलीत पुढील ७ सप्टेंबर पर्यंत लॉकडाऊन आहे. गोव्यात ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंबोली घाटमार्गाचा उपयोग केला जातो. येणाऱ्या लोकांना आंबोलीतील आनंद लुटण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे ते आंबोलीत थांबतात. आंबोलीत बाहेरून येणारे लोक बाजारपेठ थांबतात त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हा संभाव्य धोका लक्षात घेता आंबोली ग्रामपंचायत व ग्राम कृती समितीने आंबोली लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे आंबोली वासीयांनी स्वागत केले आहे.

बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्याथ टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्याप दर्या . पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्या अधिकच सुंदर दिसतात. येथील घाट मार्ग महाराष्ट्रातील महत्वाचा असा हा मार्ग आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाला जोडणारा हा मार्ग आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधला गेलेला हा घाट मार्ग अजूनही सुरक्षित आहे. या रस्त्याने प्रवास करताना आजूबाजूचा निसर्ग पहात घाटातील नागमोडी वळणे पार करणे म्हणजे एक आनंदाचा ठेवा ठरतो. पावसाळ्यात तसेच जोडून येणार्या सुट्टीला येथे पर्यटकांचा ओघ सुरु असतो. दाट जंगले, दर्याे खोर्यांेचा नयनरम्य देखावा असे अमर्याद सृष्टीसौंदर्य येथून पाहता येते आणि घनदाट जंगलातून मनमुराद भटकंती करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. आंबोली पासून जवळच असलेल्या निसर्गरम्य अशा चौकुळच्या जंगलात गवे, हरिण, भेकरे, बिबट्या, ससे, रान मांजरे असे वन्य प्राणी वास्तव्य करुन आहेत. शिवाय असंख्य प्रकारच्या वनौषधी या छिकाणी सापडतात. नुकत्याच चौकुळ येथील परिसरात ३५ ते ४० लहान मोठ्या गुहा आढळून आल्या आहेत. काही गुहा तर अतिशय भव्य आहेत. जंगल पर्यटनाची आवड असलेल्या पर्यटकांना या गुहा साद घालतात. चौकुळ हे गाव गर्द वनराईने नटलेले असून, जैविक विविधता या ठिकाणी आढळून येते. असे हे स्थळ या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे ७ सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here