सिंधुदुर्ग – बायोगॅस सयंत्र उभारणीत जिल्हा परिषद कृषी विभागाने सन 2019-20 चे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती कृषी समिती सभापती तथा जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली. बायोगॅस उद्दिष्टपूर्ती करणाऱया जिल्हय़ांना शासनाकडून दरवर्षी गुणानुक्रम दिला जातो. सन 2019-20 यावर्षी कृषी विभागाला 500 बायोगॅस उभारणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते पूर्ण झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने घोषित केलेल्या यादीत सिंधुदुर्गला तिसरा क्रमांक मिळाला आहे.



