सिंधुदुर्ग, कोल्हापूर वनविभाग राबविणार संयुक्तरित्या पुन्हा हत्ती पकड मोहीम

0
202

सिंधुदूर्ग – जिल्ह्यासह कोल्हापूरात स्थिरावलेल्या रानटी हत्तींना पकडण्यासाठी दोन्ही वनविभागाकडुन पुन्हा एकदा हत्ती हटाव मोहीम राबविण्यात येणार आहे.त्यासाठीचे नियोजन झाले असून तो प्रस्ताव नागपुर कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.यात सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चार हत्ती आणि कोल्हापूरात स्थिरावलेले दहा हत्ती,असे मिळून एकुण १४ हत्तींचा यात समावेश आहे.यासाठी मागच्या वेळी राबविण्यात आलेल्या हत्ती हटाव मोहीमेच्या पथकाची मदत घेतली जाणार आहे.त्यासाठी एका हत्तीमागे तीस लाख रुपये,असा खर्च अपेक्षीत आहे.

या प्रस्तावाला केद्र व राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर ही मोहीम राबविण्यात येणार आहे.विशेष म्हणजे पकडण्यात आलेले हत्ती तिलारीच्या वरच्या भागातील जंगलात सोडण्यात येणार आहे.त्यासाठी संप्टेबर ऑक्टोबर महीन्यात ही मोहीम होईल,असा विश्वास वनविभागाच्या अधिकार्‍यांना असून आता जुलैनंतर हत्ती पुन्हा चंदगड कोल्हापूरकडे जातील.आणि त्या ठीकाणी त्यांना पकडणे सहज आणि सोपे होईल,असे त्यांचे म्हणणे आहे.गेली अनेक वर्षे दोडामार्ग मध्ये स्थिरावलेल्या हत्तीकडुन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे.या हत्तींनी चक्क सिंधुदूर्ग जिल्ह्यातील दुसरे टोक गाठले होेते.त्यामुळे हे हत्ती चर्चेत आले होते.अनेकांना हत्तीमुळे मृत्यूच्या दाढेत जावे लागले होते. त्यामुळे हत्ती हटाव मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर काही अंशी हत्तींचा त्रास कमी झाला होता .मात्र पुन्हा हत्तीचे संकट वाढले आहे. सदयस्थितीत सिंधुदूर्गात चार आणी कोल्हापुरात दहा असे हत्ती आहेत.दरम्यान दोडामार्ग तालुक्यात स्थिरावलेल्या हत्तींकडुन मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू आहे. त्यामुळे हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी तेथिल ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार खासदार विनायक राउत आणी पालकमंत्री उदय सामंत यांनी त्यांना शब्द दिला होता. त्यानुसार हत्ती पकड मोहीम राबविण्याचा निर्णय वनविभागाकडुन घेण्यात आला आहे .तसा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे .मात्र ही मोहीम संप्टेंबर ऑक्टोबर होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here