सिंधुदुर्ग – जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४ लाख ८१ हजार ६२९ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.
यामध्ये एकूण ९ हजार ८३५ हेल्थ वर्करनी पहिला डोस तर ८ हजार २८ जणांनी दुसरा डोस घेतला.
९ हजार ९१६ फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर ८ हजार ६५२ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच ६० वर्षावरील १ लाख २० हजार २०७ व्यक्तींनी पहिला डोस तर ७९ हजार १८५ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. ४५ वर्षावरील १ लाख ४३ हजार २१९ नागरिकांनी पहिला डोस तर ८७ हजार ४७० नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
१८ ते ४४ वर्षे वयोगटातील १ लाख ९९ हजार ४५२ जणांनी पहिला डोस तर ६६ हजार ८८५ व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. असे एकूण ७ लाख ३१ हजार ८४९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
जिल्ह्याला आजपर्यंत एकूण ७ लाख २५ हजार ७२० लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये ५ लाख ५१ हजार ४८० लसी या कोविशिल्डच्या तर १ लाख ७४ हजार २४० लसी या कोवॅक्सिनच्या आहेत.
तर ५ लाख ६९ हजार ५९८ कोविशिल्ड आणि १ लाख ६२ हजार २५१ कोवॅक्सिन असे मिळून ७ लाख ३१ हजार ८४९ डोस देण्यात आले आहेत.
सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण ३९ हजार ५५० लसी उपलब्ध असून त्यापैकी २३ हजार १५० कोविशिल्डच्या आणि १६ हजार ४०० कोवॅक्सिनच्या लसी आहेत.
जिल्ह्यात सध्या ९०० लसी शिल्लक असून त्यापैकी ४५० कोविशिल्ड आणि ४५० कोवॅक्सीनच्या लसी शिल्लक आहेत.