सिंधुदुर्गात शासनाने रॅपिड टेस्ट ३ लाख किट द्यावीत-प्रमोद जठार

0
137

 

सिंधुदुर्ग – शिवसेना आ.वैभव नाईक कोरोना पॉझिटिव्ह आलेत,जरी राजकीय मतभेद असले तरी ये लवकर बरे व्हावेत.सिंधुदुर्गात १६ जुलैला मुबंईतुन थेट पालकमंत्री आलेत.त्यांनी आल्यानंतर बैठका घेतल्या,पालकमत्र्यांनी पहिली कोरोना टेस्ट करावी.कदाचित वैभव नाईक यांना पालकमंत्र्यांनी प्रसाद दिला असावा, असे उपरोधक टोला माजी आ.प्रमोद जठार यांनी लगावला.तरिदेखील पहिल्यादा पालकमंत्री उदय सामंत यांनी आपली कोरोना तपासणी करुन घ्यावी,असा सल्ला त्यांनी दिला.

कणकवली नगरपंचायत येथे पत्रकारांशी त्यांनी सवाद साधला.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड,बांधकाम सभापती संजय कामतेकर, विराज भोसले,शिशिर परुळेकर,अजय गांगण आदी उपस्थित होते.

राजकीय मतभेद असले तरी वैभव नाईक बरे व्हावेत,ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे.वैभव नाईक स्थानिक रहिवासी आमदार आहेत,यांच्यापर्यत कोरोना पोहचला.सामूहिक संसर्ग सुरू झाला आहे.आता सरकारने कंबर कसुन कामाला लागले पाहिजे. ही गंभीर बाब आहे,लोकांनी काळजी घ्यावी.तसेच मुबंई येथून येणाऱ्या सर्व चाकरमानी यांची चेक पोस्टवर तपासणी करावी,असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले.

कोकणात कम्युनिटी स्पिरीट सुरु झाला.रॅपिड अँटिंजेट टेस्ट चालू करावी.केवळ ४५० रुपये किट आहे.सिंधुदुर्गात किमान ८ शहरांमध्ये रॅपिड टेस्ट सरकारने सुरु करावी.हा सामूहिक संसर्ग आहे,पालकमत्र्यांनी अनेक बैठका घेतला.पालकमंत्री बाहेरचे आहेत,मी सिंधुदुर्ग सोडला किंवा आलो तर टेस्ट करुन घेतो.आ.नाईक यांच्या सोबत असलेल्या सर्व नेतेव पदाधिकारी यांची रॅपिड टेस्ट करा.आता जिल्हा आरोग्य यंत्रणेकडे रॅपिड टेस्ट ५०० किट आहेत, ते ताबडतोब वापरा,असे आवाहन प्रशासनाला प्रमोद जठार यांनी केले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे म्हणाले,आ.वैभव नाईक यांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहे,असे समजले.सकाळी ११.३० वाजता आम्ही सँनीटायझर केलं.शिवसेनेचे सतीश सावंत,संदेश पारकर व अन्य नेते होते.त्यांनी पालकमंत्री सोबत असताना भालचंद्र बाबा मठ,आचरेकर प्रतिष्ठान,एसटी स्टँड,नरडवे धरण प्रकल्प बैठक झाली.त्या नेत्यांनी १४ दिवस कॉरंटाईन स्वतःहून व्हा,सहकार्य आम्ही करु.कणकवलीत रॅपिड टेस्ट शासनाने ५ हजार किट द्यावेत.आम्ही केसेस दाखल करणार नाही.पण राजकिय नेत्यांनी स्वतःहून कॉरंटाईन करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here