सिंधुदुर्ग – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना महायुतीने बिनविरोध निवडींचा ‘राणे पॅटर्न’ राबवत विरोधकांना धक्का दिला आहे. पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे एकूण आतापर्यंत १२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
जिल्हा परिषद निवडणुकीत खारेपाटणच्या प्राची इस्वालकर, कोळपेचे प्रमोद रावराणे, बांद्याचे प्रमोद कामत, जानवलीच्या रुहिता तांबे, पडेलच्या सुयोगी घाडी आणि बापर्डेच्या अवनी तेली यांची थेट सदस्यपदी निवड झाली आहे.
पंचायत समितीत कणकवली (वरवडे) येथील सोनू सावंत, देवगडमधील अंकुश ठूकरूल, गणेश राणे व संजना लाड, तसेच वैभववाडी (कोकीसरे) येथील साधना नकाशे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. निवडणुकीच्या सुरुवातीलाच मिळालेल्या या यशामुळे सिंधुदुर्गच्या राजकारणात राणे कुटुंबाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.



