सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये अस आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर यांनी पत्रकार परिषदेत केल. जिल्ह्यात दहा मार्च पासून आतापर्यंत ३९ परदेशी पर्यटकांची तपासणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. नलावडे आदी उपस्थित होते.