सिंधुदुर्गात कोरोनाचे संकट पुन्हा वाढतेच, कणकवलीत स्वाब देण्यासाठी मोठी गर्दी

0
206

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना नेते कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर हे पॉझिटिव्ह आल्यानंतर कणकवलीत आपला स्वाब देण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबत या दोन्ही नेत्यांनी कणकवलीसह जिल्हाभर दौरा केला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत 249 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ५८ सक्रिय रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची संख्या आटोक्यात येत असताना अचानकपणे शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि जिल्ह्याच्या राजकीय व्यवस्थेबरोबर प्रशासकीय यंत्रणा चांगलीच हादरली. आमदार नाईक यांनी जिल्हाभर दौरा केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्यासोबतही ते दौऱ्यात होते. कणकवली येथील दौरा आणि संदेश पारकर यांचा वाढदिवस अशा महत्वाच्या कार्यक्रमात वैभव नाईक उपस्थित होते. पालकमंत्री सामंत यांच्या दौऱ्यात वैभव नाईक यांच्यासोबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कणकवली प्रांताधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली तहसीलदार, पोलीस निरीक्षक असे महत्वाचे अधिकारीही होते. नाईक पॉझिटिव्ह येताच या सर्व अधिकाऱ्यांनाही तात्काळ खबरदारी घेण्याचे सुचविण्यात आले. तसेच या दौऱ्याचे वार्तांकन करणारे विविध माध्यमाचं वार्ताहर, जिल्ह्यातील संस्थांचे पदाधिकारी यांनाही यांचे तत्काळ स्वाब घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

सध्यस्थितीत आमदार वैभव नाईक यांच्यासोबत त्यांच्या संपर्कात आलेले त्यांची मुलगी, चुलत भाऊ, स्वीय्य सहाय्यक, शिवसेना नेते संदेश पारकर, पालकमंत्री उदय सामंत यांचे स्वीय्य सहाय्यक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शिवसेना नेत्यांमधील या फैलावाने जिल्ह्यात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. पॉझिटिव्ह आलेले हे दोन्ही नेते कणकवलीचे असल्याने त्यांच्या नियमित संपर्कात असलेले कणकवलीत लोकांनी येथील स्वाब कलेक्शन सेंटरवर स्वाब देण्यासाठी गर्दी करायला सुरवात केली आहे. दर दिवशी सुमारे ७० ते ८० लोकांचे स्वाब कणकवलीत घेतले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here